अकोट (प्रतिनिधी)- अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, मनिष गणोरकर यांनी माजी राज्यमंत्री गुलाबराव रामराव गावंडे यांनी अकोट तालुक्यातील बळेगाव फाटा येथे शासकीय रस्त्याचे बांधकामात अडथळा निर्माण केला म्हणून भादंविचे कलमान्वये ३ महिने कारावास व २हजार रूपये दंड , दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा तसंच सरकारी कर्मचा-याला कर्तव्य करीत असताना इजा पोहचविली असल्याने भादंविचे कलम ३३२ सहकलम ११६ प्रमाणे महिना कारावास व ५०० एवढा दंड, दड न भरल्यास पुन्हा ७ दिवसाची शिक्षा ठोठावली असून या दोन्ही शिक्षा आरोपीने एकत्रित भागावयाच्या आहेत, असे निकालपत्रात नमूद करण्यात आले. या प्रकरणातील दुसरे माजी आमदार गजानन दाळू गुरूजी याची निदोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी राज्यमंत्री गलाबराव गावंडे होते.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी एकण ८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. त्यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक विभागाचे तत्कालीन अभियंता मनोज बैस, अभियंता मंगलसिंग पाकळ, प्रतिष्ठित नागरीक राजीव बोचे, अकोट वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता चव्हाण, तपास अधिकारी ए पी आय. बी. आर. गावडे यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.या ३१ मे २०१३ रोजी अकोट अकोटचे सा.बां. विभागाचे तत्कालीन उपअभियंता मनोज बैस यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला यासंबंधी लेखी फिर्याद दिली होती. या फिर्यादीत बैस आणि इतर शासकीय कर्मचारी कर्तव्य बजावत असताना गुलाबराव गावंडे, गजानन दाळू गुरूजी व त्यांच्या सोबतचे इतर १०ते१२ साथीदारांनी गैरकायदेशिर मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा आणून मला मारण्याच्या उद्देशाने माझ्या अंगावर भरपूर प्रमाणात ज्वलनशील रासायनिक द्रव्य ओतले. त्यामुळे माझ्या अंगाला जळजळ होऊन इजा झाली आहे.
तसेच इतर कर्मचारयांना धक्काबुक्की व लोटलाट करून शिवीगाळ करून मारहाण केली यासह अधिक सविस्तर फिर्यादीत म्हटले होते.या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख व आरोपीतर्फे अॅड. गांधी यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सदर शिक्षा आरोपीस ठोठावली आहे.