अकोट प्रतिनिधी (देवानंद खिरकर): दि.30 रोजी अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे अकोट तहसील निवेदन सादर, उमरा मंडळ ,अकोलखेड मंडळ ,पणज मंडळ, या मंडळातील 2019, 20 वर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या फळबाग शेतकऱ्यांची आज तहसीलवर धाव यावर्षी अवकाळी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे फळबाग व पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे या तिन्ही मंडळातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहे.
त्यामुळे अकोट महसूल व कृषी विभागाचे संयुक्तपणे मोका पाहणी व पंचनामे सुद्धा झालेले आहेत, परंतु अद्याप पर्यंत ही कुठलीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही व मिळाली तर नाहीच त्यावर परंतु शेतकऱ्यांना या मदतीतून वगळण्यात आलेले आले आहे, त्यामुळे सर्व फळबाग शेतकऱ्यांचे संत्रा, केळी, नींबू या पिकांचे अक्षरशः नुकसान झालेले आहे, त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना पात्र लाभार्थी म्हणून यांची निवड करण्यात येऊन यांना आर्थिक मदत मिळण्यात यावी अन्यथा अकोट तालुक्यातील सर्व फळबाग शेतकरी आम्ही जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू या आशयाचे निवेदन आज अकोट तहसील देण्यात आले तसेच 2019 संत्रा मृग बहार व केळी पिक विमा क्लेम अद्याप पर्यंत लागू झालेला नाही विमा कंपनीला संपर्क केल्यास उत्तराची टाळाटाळ करीत आहेत.
तरी तो विमा सर्व शेतकऱ्यांना त्वरित मिळण्यात यावा यासाठी नायब तहसीलदार श्री राजेश गुरव यांच्याकडे निवेदन देण्यात आले,त्यावेळेस प्रामुख्याने उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे , शिवसेना तालुकाप्रमुख श्याम गावंडे ,प्रशांत भगत ,बाळूभाऊ नाटे, गजानन मावळकर ,निर्मल ठाकुर ,शुभम गावंडे ,सुधीर नागोराव भिल, गणेश मानकर , सरपंच पंकज मानकर ,गोपाल जवंजाळ ,धीरज शेळके ,अजय तीवाने ,राम भालतिलक ,विनोद भाऊ गये,सागर भालतिलक , शिरीष महल्ले ,राजू राऊत ,ढोकणे गुरुजी ,गजानन वानखडे ,सचिन सोनोने, वामन राऊत ,धीरज ढोणे, अनिल बोंडे ,अशोक सदाफळे ,हरिदास खवले ,रविंद्र घोरड , विशाल भालतिलक , मनोहर वाघमारे ,गजानन लाहोरे, योगेश मेतकर ,अनंता घोरड, व्यंकट मुंडे, दादू पालवे, अनंता सरोदे ,योगेश भिल ,भास्कर भाऊ, विनायक गावंडे ,वासुदेव वानखडे, सागर कोरडे ,मंगेश आगलावे, व शेकडो शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.