अकोट(प्रतिनिधी)- ग्रामीण वऱ्हाडी साहित्यातून प्रदर्शित होणाऱ्या सर्वांगीण विकासाच्या वाटा गावखेड्यांना समृद्धी कडे नेतात यामधून आपसूकच गावातील तसेच परिसरातील प्रत्येक नागरिकांची आपापल्या क्षेत्रात योग्य जळघळण होऊ शकते, ग्रामीण साहित्य संमेलनातून भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान काळातील प्रगती व इतिहास येणाऱ्या पिढी समोर मार्गदर्शक ठरतो. ग्रामीण भागातील समृद्ध विकास व्हावा याच उदात्त हेतूने अकोट तालुक्यातील नंदिग्राम पुंडा येथे राज्य स्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन मराठी राज भाषा दिन 27 व 28 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या संमेनाला राज्य पातळीवर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 1 डिसेंबर रोजी अकोटातील वसुंधरा ज्ञानपीठ येथे पहिली बैठक पार पडली. यावेळी या होऊ घातलेल्या संमेलनाच्या कार्याध्यक्ष पदी प्रगतशील शेतकरी युवा उद्योजक ब्रम्हकुमार पांडे यांची एक मताने निवड करण्यात आली आहे.
या बैठकीला प्रामुख्याने प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विठ्ठल कुलट, कृ. उ. बाजार समितीचे माजी संचालक गजाननराव गावंडे, नंदीग्राम पुंडाचे सरपंच शिवाजी सपकाळ, माजी सरपंच अरुण काकड, माजी शिवसेना शहर प्रमुख छोटू पा. गावंडे, सुदन कुलट, अशोकराव चौधरी, विठ्ठलराव डोबाळे, डॉ. महेश कुलट, प्रकाश गायकी, विनोद राठोड, निलेश पोटे, विशाल कुलट, राहुल कुलट आदी उपस्थित होते. यावेळी संमेलनाच्या अनुषंगाने विविध विषयावर चर्चा करण्यात आली. ग्राम पुंडा येथे भव्य स्वरूपात या संमेलनाचे आयोजन करण्याविषयी प्रत्येकाने विचार व्यक्त केले. यानिमित्ताने अजूनही बैठका घेण्यात येतील. तसेच संमेलन आयोजन समिती सदस्यांची नावे निश्चित करण्यात येतील असे या वेळी सांगण्यात आले. या प्रसंगी पत्रकार निलेश पोटे यांना राज्य स्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीचे प्रस्ताविक प्रा. विठ्ठल कुलट, संचालन प्रकाश गायकी तर आभार प्रदर्शन डॉ. महेश कुलट यांनी कुलट यांनी केले.