तेल्हारा- महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच तेह्वार्यात महाविकास आघाडीच्या वतीने फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करून आंनदोउत्सव साजरा करण्यात आला .
महाराष्ट्र विधानसभेच्या 1 महिना 4 दिवस झाल्या नंतर अखेर महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला आहे .राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवतीर्थावर वर मोठ्या थाटामाटात झालेल्या सोहळ्यात ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच तेल्हारा शहरात शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस , राष्ट्रीय काँग्रेस, प्रहार जन शक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, व महाविकास आघाडीत सहभागी सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतड्याला हारापर्ण करून मिठाई वाटून व फटाक्यांची प्रचंड अतिष बाजी करून आंनद उत्सव साजरा करण्यात आला.
त्यानंतर शहरातून विजय मिरवणूक काढून श्री तानाजी चौकात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज ,व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतड्याला हारापर्ण करून जल्लोष करण्यात आला . यावेळी शिवसेना , युवासेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,युवक काँग्रेस , प्रहार जनशक्ती पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.