अकोट(देवानंद खिरकर)- आज दि 28/11/2019 रोजी आकोट आगारची अकोट यवतमाळ घेऊन जात असताना चालक श्री व्ही ए इंगळे आणि वाहक श्री ए के जाधव कर्तव्यावर असताना बस धानोरा फाट्यावरून निघाली असता बस मध्ये एका गरोदर महिला प्रवासी ला त्रास होऊ लागला याची माहिती चालक श्री VA इंगळे याना कळताच त्यांनी बस शासकीय रुग्णालयाकडे वळवली मात्र महिला प्रवासी कडे वेळेची कमी असल्यामुळे सदर महिलेला बसमध्येच बाळाला जन्म द्यावा लागला आनंदाची बातमी अशी आहे की सदर महिलेला मुलगी झाली आणि प्रवासी महिलेची परिस्तिती उत्तम आहे आणि आपल्या चालकांनी प्रवासी महिलेला रुग्णालयात दाखल करून त्याच्या तब्बेतीची शहानिशा करून बस यवतमाळ येथे जाण्यासाठी सज्ज केली आज आपल्या अकोट आगारातील चालक श्री VA इंगळे व वाहक श्री AK जाधव यांनी खरच कौतुकास्पद कामगीरी बजावली त्या बद्दल मनस्वी अभिनंदन