तेल्हारा(प्रतिनिधी)- सिरसोली येथिल युद्धभुमिवर 29 नोव्हेंबरला शौर्यदिन साजरा करण्यात येत आहे.1803ला झालेल्या युद्धामध्ये शहीद झालेल्या तमाम हौतात्मांना वंदन करण्याकरिता राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शौर्यदिन आयोजन समितीने केले आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सिरसोली या गावी 23 ते 29 नोव्हेंबर १८०३ मध्ये मराठा व इंग्रज यांच्या मध्ये फार मोठे युद्ध झाले. हे युद्ध ६ दिवस चालले. इंग्रजांकडे अत्याधुनिक शस्त्रे असुनही मराठ्यांनी तलवारीच्या जोरावर इंग्रज सैन्य कापून काढले होते. कर्ताजीराव जायले यांनी स्वतःचे बलीदान देऊन कॅप्टन केनला ठार मारले .
अठरा पगड जातीतील सर्व सैनिक जिवाची पर्वा न करता लढले व अतुलनीय शौर्य गाजविले. साता समुद्राच्या पार असणारे ब्रिटिश दरवर्षी कॅप्टन केन व मृत्युमुखी पडलेल्या इंग्रज सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी येतात पण भारतीय मात्र या युद्धाबद्दल अनभिज्ञच आहेत.
या युद्धातील पराक्रमाची जागतीक नोंद आहे. या ईतिहासातिल अतुलनीय शौर्याची यशोगाथा जनतेपर्यंत पोहचवण्याकरिता दरवर्षी सिरसोली येथिल युद्धभुमिवर शौर्यदिन साजरा करण्यात येत आहे.यावर्षि 29 नोव्हेंबरला शौर्यदिन साजरा होत आहे.या आयोजनासंबंधी राजमंगल येथे सभा घेण्यात आली. सभेमध्ये नियोजनबाबत निर्णय घेण्यात आले.या ठिकाणी येणार्या नागरिकांकरिता महाप्रसादाची व्यवस्था करण्याचे ठरविण्यात आले.या सभेला अनंत गावंडे, तुषार पुंडकर,मणिष कराळे,दिलीप बोचे ,उमेश जायले ,प्रा.संतोष झामरे,अवि सावरकर ,अजय अरबट प्रा बोबडे,विष्णू झामरे, प्रविण भगत,अवि डिक्कर ,श्रीजित कराळे,दिपक जायले,डी.आर साबळे,सुनिल जायले,योगेश वाकोडे ,हिम्मत गावंडे आदि युवकांची ची उपस्थिति होती.
शुरविर सरदार कर्ताजीराव जायले व सर्व अठरा पगड जातीतील शहिद सैनिकांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्व राष्ट्रभक्तांनी यावर्षी २९ नोव्हेंबर २०१९ गुरूवारी सिरसोली येथे शौर्य दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून या गौरवशाली ईतिहासाला वंदन करावे.असे आवाहन शौर्यदिन आयोजन समितीने केले आहे.