राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अखेर उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द करण्यात आल्याची सूत्री माहिती आहे. अजून यावर अधिकृत घोषणा झालेली नाही. राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांसह पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी समजूत काढल्यानंतर अखेर अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे.
सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रात उद्या बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. अशातच अजित पवार यांनी ऐनवेळी राजीनामा दिल्याने भाजपची मोठी अडचण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमताचा 145 हा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे.