अकोट(प्रतिनिधी)- अकोट तालुक्यातील चोहट्टाबाजार जवळ असलेल्या करोडी गावात आज सकाळच्या सुमारास रेल्वे पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. दरम्यान, मृतदेहाची प्रथमदर्शनी पाहणी केली असता, सादर महिलेने विष प्राशन केले असून तिचे नाव शोभा संतोष टोपकर असल्याचे समजते.
ही महिला चोहट्टाबाजार येथील रहीवाशी असून काही दिवसा पूर्वी सादर महिलेचा प्रेम विवाह करोडी गावातील संतोष टोपकर या युवकाशी झाले होते संतोष टोपकर हा अकोला पुणे खाजगी लक्झरी बस वर ड्रायव्हर चे काम करतो. दोघं नवरा बायकोचे सतत काही ना काही कारणा वरून भांडण सुरू असत त्यावरून सदर महिलेने विष प्राशन केले की तिला पाजण्यात आले या बाबत गावात उलट सुलट चर्चा सुरू आहे. सादर घटनेची माहिती मिळताच दहीहंडा पोलीस घटना स्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे ही नेमकी हत्या आहे की आत्महत्या या बद्दल नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे!