अकोट( देवानंद खिरकर) – जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांची नासाडी झाली असुन शेतकरी हवालदिल झालेला आहे.त्यातच मागिल वर्षी 2018_19 या वर्ष्यात काढलेला केळी पिकांचा विमा अद्यापपरंत मिळालेला नसून विमा कंपनि देण्यास टोलवा टोलवी करत असल्याने आज केळी उत्पादक शेतकर्यांनि पुन्हा आक्रमक होवुन न्यू इंडिया ईन्शूरन्स कंपनिच्या कार्यालयात धडक दिली.
अकोट तालुक्यातील पनज, दिवठाणा, बोचरा, रुईखेड, अकोलिजहागिर, वाई या परिसरात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून मागिल वर्षी पिकांसाठी वातावरण पोषक नसल्याने व पिकांची वादळी वार्याने पडझड झाल्याने या भागात कळी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,शेतकर्यांनि प्रति हेक्टरी 8800 रुपये विमा काढला होता,त्यामूळे केळी उत्पादक शेतकर्यांनी 18 नोव्हेंबर रोजी या कार्यालयात ठिया अंदोलन केले होते.याचवेळी शाखा व्यवस्थापक यांनी पंधरा दिवसात सर्व नुकसानग्रस्त शेतकारी यांचा पिकविमा जमा होइल असे आस्वासन दिले होते.
मात्र मोजक्याच शेतकर्याच्या खात्यात रक्कम जमा झाल्याने या भागातील शेतकर्यांनि आज पुन्हा आपला मोर्चा आज कंपनिच्या कार्यालयात वळवुन या सबंधीत जाब अधिकार्यांना विच्यारला असता या सबंधीत कुठलच रेकार्ड आमच्याकडे ऊपलब्ध नसून अहमदनगर येथिल कार्यालयात शेती सबंधीत रेकार्ड उपलब्ध असल्याचे संगितले व तेथील अधिकारी यांच्याशी संपर्क साधून येत्या 2 डिसेंबरला पिकविम्या पासून वंचित असलेल्या शेतकर्याच्या विमा स्टेटस पाहून सातबारा बँक खात्यात त्रुटी असल्यास त्या सबंधी कार्यवाही सुधा वेळीच करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
तसेच अकोलखेड व पणज सर्कल मधे केवळ सहा किलोमीटरचे अंतर असून या दोन्ही भागातील शेतकर्याचा मिळणारा विमा यात दुप्पटचा फरक कस? असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला,यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष तुषार फुंडकर यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले, विमा कार्यालयात शेकडो शेतकरी दाखल झाल्याने परिस्थीतीचे गाभीर्य ओळखून खदान पोलिस स्टेशनचे ठानेदार उत्तम जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व संपुर्ण परीस्थिती जाणून घेतली.यावेळी शेतकर्यांनि उपव्यवस्थापक वाडेकर यांना निवेदण दिले,यामधे पिकवीमा न मिळाल्यास आपल्या कार्यालया बाहेर आमरण उपोषनाचा ईशारा शेतकर्यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी राहुल शेंडे,रामेश्वर भगत,राजू शेंडे,दिनेश बोचे,निलेश अकोटकर,उमेश अकोटकर,पंजाबराव बोचे,हरीदास शेंडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.