बोर्डी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी व ईतर पाच यांना गौणखनिज प्रकरणी उपविभागीय अधिकारी अकोट यांनी गैरअर्जदार 1 ते 5 यांना दि.1/3/2019 ला 22 लाख रुपये दंड केला आहे.परंतू गेल्या तिनवर्षा पासुन आज परंत सदर दंडाची वसुली किवा कारवाई न झाल्यामुळे बोर्डी मधुन जनता दरबार मधे तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्या तक्रारची दखल घेत सदर दंडा बाबत उपविभागिय अधिकारी अकोट,जिल्हाखनिकर्म अधिकारी अकोला, अप्पर जिल्हाधिकारी अकोला,पालकमंत्री अकोला यांनी दंड वसुली करुन कारवाई करने बाबत तहसीलदार अकोट यांना लेखी आदेश दिल्यावरुन अकोट तहसीलदार यांनी आज तिनवर्षा पासुन पेंटीग असलेला ग्राम पंचायत व ईतर पाच यांना गौणखनिज प्रकरणी 22 लाख रुपये दंडाबाबत दखल घेत.सदर प्रकरणात बोर्ड़ीचे तलाठी खामकर यांचे कडून सबंधीत गैरअर्जदार यांचेकडे असलेल्या मालमत्ते बाबत लवकरच अहवाल मागविन्यात येईल.व बोर्ड़ीचे तलाठी खामकर यांचा अहवाल प्राप्त होताच गैरअर्जदार यांच्यावर बोजा चढवन्याची कारवाई करण्यात येईल. असे आज तहसीलदार अकोट यांनी अर्जदार यांना आस्वासन दिले आहे.
,,
प्रतिक्रीया,,
ग्राम पंचायत बोर्डी गौणखनीज 22 लाख रुपये पेंटीग असलेल्या दंड प्रकरणी बोर्ड़ीचे तलाठी खामकर यांना गैरअर्जदार यांचे मालमत्ते बाबत अहवाल मागितला आहे.अहवाल प्राप्त होताच बोजा चढवन्याची कारवाई करण्यात येईल.
अशोक गिते तहसीलदार अकोट.
तक्रारदार
माझ्या तक्रारवर ग्राम पंचायत बोर्डी व ईतर पाच यांना गौणखनिज प्रकरणी 22 लाख रुपये पेंडीग असलेल्या दंडाबाबत वसुली किवा बोजा चढवन्याची कारवाई करण्यात यावी.