वाडेगांव (डॉ शेख चांद)- भारतरत्न अटल बिहारी वाजपयी आंतरराष्ट्री जिल्हा परिषद शाळा वाडेगांव येथे प्रभात किड्स स्कुल अकोला व विशाल हिमालय फाऊंडेशन (यु .एस.ए. ) यांच्या संयुक्त विद्यमाने ” वाचन प्रभात ” हा शालेय विद्यार्थांसाठी फिरते वाचनालय असलेला उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाचा उद्देश शालेय जीवनापासूनच विद्याथ्र्यांना पुस्तकांची ओळख व्हावी व त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हा आहे हा उपक्रम प्रभात किड्स स्कुल चे संस्थापक अध्यक्ष गजानन नारे सर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे. फिरते वाचनालय हे भारतरत्न अटल बिहारी वाजपयी आंतरराष्ट्री जिल्हा परिषद शाळा ( मुले) वाडेगांव येथे आले असता सर्व प्रथम या वाचनालयाचे उद्दघाटन शाळेचे मुख्याद्यापक समाधान सोर सर, अध्यक्ष संतोष काळे, उपाध्यक्ष डॉ एस चांद , ज्ञानेश्वर पुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या नंतर शाळेतील ५२५ विद्यार्थांनी, शिक्षक, इतर नागरीक, वृध्द महीलानी या फिरते वाचनालयाचा लाभ घेतला. यावेळी वाचन प्रभात उपक्रमाचे समन्वयक सचिन सुपळकर, राहुल मानकर, सुधाकर आढे, भवानिशंकर दुबे , मिलिंद नवलखे यांचा शाळेच्या वतीने पुछप्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक सुधिर घाटोळ, अनिल धोत्रे, गजानन लांबटोंगळे, रामदास वाघ, वाकोडे सर, राठोड सर, कंडारकर सर, तडस सर, जोशी मॅडम , राठोड मॅडम, जावरकर मॅडम, गोतमारे मॅडम, हाडोळे मॅडम, पिंपराळे मॅडम, काळबांडे मॅडम, गोमाशे मॅडम, फाटे मॅडम, चव्हाण मॅडम, फाटे मॅडम, खोपे मॅडम , देशमुख मॅडम, रुपाली तळेकर मॅडम , शाळा व्यवस्थापण समीतीचे सर्व सदस्य, विद्यार्थी उपस्थीत होते.