पातुर(सुनील गाडगे)- पातुर तालुक्यातील पिपंळडोळी या गावातील शेतक-यानी सततची नापिकी आणि या वर्षात पडलेला ओला दुष्काळामुळे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला कर्जमुक्तीचा घोळ व त्यामुळे शेतक-यांना न मिळालेले कर्ज या कारणाने शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला असुन जेव्हा चारही बाजूंनी व्यवहार होत नोव्हता,संपुर्ण परिवाराची जवाबदारी आपल्यावरच आहे, शेतात पीक हि नाही आणि मंजुरीही नाही, अशा अंधारमय परीस्थिती कुठेच आशेचा किरण दिसला नाही, तेव्हा या भल्या शेतक-यानी आपल्या शेत रस्ताच्या वाटेवरील झाडाला गळफास घेऊन तुळशीराम शिंदे यांनी आपली जीवनयात्रा संपवली,त्यांच्या मागे त्याची पत्नी सुशीलाबाई शिंदे, मुलगा दिलीप व विनोद शिंदे,आणि तीन मुलीचा समावेश आहे, हे विदारक चित्र मा. श्री. कृष्णाभाऊ अंधारे यांनी पाहताच या आदिवासी कुटुंबातील सदस्यांना धीर देऊन त्यांना लगेच सरकारची मदत मिळे पर्यंत, आपल्या खिशातून नगदी ११००० रूपयाची आर्थिक मदत देऊन शिंदे कुटुंबीयांच सातवन केल, या वेळेस शेतकरी जागर मंचाचे मा.मनोज तायडे, विनोद महल्ले,विश्वजित देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते.