पातूर(सुनील गाडगे )- पाणी पुरवठा विभागाद्वारे गुरुवार पेठ सह गावामध्ये इतर भागात परिसरात नळ रात्रीच्या वेळेला ठिक ९ वाजता सोडण्यात आले आहेत ऐन थंडिच्या दिवसात महिला भगिनींना पाणी भरण्याचे काम करावे लागत आहे तसेच पाणीसुद्धा कमी प्रमाणात सोडत आहेत कधी ८वा कधी ९ वाजता नळ सोडत आहेत पाणीपुरवठा सोडण्याचे वेळापत्रकानुसार थंडिचे दिवस असल्यामुळे पुरवठा हा ५ वाजता सोडण्याची मागणी होत आहे या प्रभागात ३० ते ४० ग्राहक असुन शहरात शेकडो ग्राहकांची गैरसोय होत आहे हे एक प्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे त्याचप्रमाणे दुषित पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे शहरातील आरोग्य धोक्यात आले आहे. पातूर पुरवठा विभागाचे अधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. मुख्यालयी हजर राहून अधिकारी यांनी शहराला शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्राहकात आहे.