अकोला (प्रती)- आर डी जी व एल आर टि महाविद्यालयातील पार्कीग वसुली बंद करावी अशि मागणि करीता उमेश इंगळे रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला यांच्या मार्गदर्शनात व अक्षय दांडगे कार्याध्यक्ष रिपब्लिकन विद्यार्थी सेना यांच्या नेत्वृवात अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन द्वारा केली आहे आर.डी.जी व आर.एल. टी महाविद्यालयामध्ये गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अतंर्गत बि.एस.सी,बि.ए,बि.कॉम,परीक्षा सुरु आहेत परीक्षेकरीता येत असलेल्या दुसऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडुन जबरदस्ती पार्कीग वसुली सुरू केली आहे त्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मीळत आहेत हे पार्कीग वसुली कोणत्या नियमाच्या आधारे करण्यात येत आहे अनधीकृत असेल तर ताबड़तोड़ बंद करावी अन्यथा रिपब्लिकन विद्यार्थी सेना आंदोलन छेडणार आहे अशी मागणि रिपब्लिकन विद्यार्थी सेना कार्याध्यक्ष अक्षय दांडगे यांनी केली निवेदन देते वेळी रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला जिल्हा प्रमुख उमेश इंगळे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रतिक घोगंरे,क्रीष्णा राऊत, चंदन मोहोड,सतिश तेलगोटे,संदीप क्षिरसागर, पवन गमे, विशाल देखमुख,महेश खोडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते