पातुर (सुनील गाडगे)- आदिवासी समाजाचे क्रांतिकारी नायक व समाजसुधारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त बाळापूर रोड ते वाशीम महामार्गावरून भव्य शोभायात्रा समाजबांधवांनी काढली असता, पातुर शिवसेना शहर प्रमुख अजय ढोणे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून व तसेच त्यांच्या शुभहस्ते भव्य चहा-नाश्ता फराळाचे वाटप करून व तसेच आयोजकांचे शाल व श्रीफळ तसेच पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ह्या वेळी शिव सेना प्रसिद्धी प्रमुख राहुल शेंगोकार ,शंकर देशमुख,दिगंबर खुरसाडे,संतोष राऊत,दिलीप फुलारी,गणेश बुलबुले,सुभाष राखोंडे,संतोष साबळे,मधू इंगळे,गैरव माकोडे,सचिन फुलारी,किशोर फुलारी,संदीप राऊत इत्यादी शिव सैनिक व पदाधिकारी हजार होते.