अकोला(प्रतिनिधी)- अकोला शहरात हजारो वाहने दररोज धावतात, त्यातच अशोक वाटिका ते टॉवर चौक व नेकलेस रोड ह्या दोन महत्वाच्या रोड चे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्या साठी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची बरीच धावपळ होते, सप्टेंबर व ऑक्टोम्बर हे दोन महिने वेगवेगळ्या बंदोबस्तात गेल्याने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन धारक ह्यांच्यावर पाहिजे त्या प्रमाणात कारवाया झाल्या नाहीत कारण बंदोबस्त व रोड बांधकाम मुळे वाहतूक नियंत्रित करण्यात कर्मचारी व्यस्त होते.
परंतु आता कोणताही महत्वाचा बंदोबस्त नसल्याने शहर वाहतूक शाखा एक्शन मोड वर आली असून शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे आदेशाने मंगळवारी शहराच्या वेगवेगळ्या चौकात विशेष मोहीम राबवून एकाच दिवसात 231 वाहन धारका विरुद्ध वाहतुकीचे नियम मोडल्याने कारवाई करून 45,000 रुपयांचा दंड वसूल केला, ह्या मध्ये निर्धारित वेळ सोडून शहरात प्रवेश करणारे जड वाहने, मोटारसायकल वर ट्रिपल सीट जाणारे, चालत्या वाहनावर फोन वर बोलणारे, समोर प्रवासी बसवून ऑटो चालविणारे, वाहन चालविण्याचा परवाना नसणारे, वाहतुकीला अडथळा होईल असे रस्त्यावर वाहन लावणारे अश्या विविध वाहन धारकवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन धारकवर दररोज कारवाया करण्यात येणार असून वेगाने वाहन चालविणारे व दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर सुद्धा विशेष मोहीम राबवून कारवाया सुरू करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगीतले