नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालय आज (शनिवार) निकाल देणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल देणार आहेत. त्यामुळे या महत्त्वपूर्ण निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी याआधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.
अयोध्या खटल्याच्या निकालाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स…
>> ट्रस्ट स्थापन करून मंदिर उभारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
>> सुन्नी वक्फ बोर्डाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत
>> मुस्लिमांना पर्यायी पाच एकर जागा देणार
>> अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदुंची; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वापूर्ण निकाल
>> १८५६-५७ पूर्वी नमाजपठणाचे पुरावे नाहीत – न्यायालयाचं निरीक्षण
>> १८५६ पूर्वी वादग्रस्त जागेवर हिंदूंकडून चौथऱ्यावर पुजा – सर्वोच्च न्यायालय
>> मशिदीचं निर्माण मंदिर उद्धवस्त करून करण्यात आलं हे पुरातत्व विभागाला स्थापित करता आलं नाही – सर्वोच्च न्यायालय
>> हिंदुंची श्रद्धा आणि विश्वास की भगवान रामाचा जन्म अयोध्येत झाला, हे निर्विवाद आहे: सर्वोच्च न्यायालय
>> मशीद रिकाम्या जागी बांधली होती. पण मशिदीखालचा संरचना इस्लामिक नव्हती: कोर्ट
>> रामलल्लाला कोर्टानं पक्षकार मानलं
>> पुरातत्व विभागाचे दावे कोर्टाने धरले ग्राह्य
>> निर्मोही आखाड्याचा दावा कोर्टाने फेटाळला
>> एकाची श्रद्धा दुसऱ्याचा हक्क हिरावू शकत नाही : कोर्ट
>> शिया वक्फ बोर्डाचा दावा एकमताने फेटाळला. गोगोई म्हणाले, ‘आम्ही १९४६ च्या फैजाबाद कोर्टाच्या निकालाला आव्हान देणारी शिया वक्फ बोर्डाची सिंगल लीव पिटीशन फेटाळत आहोत’
>> खटल्याच्या निकाल वाचनाला सुरुवात