अकोट (प्रतिनिधी)- काल अकोट तालुक्यात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. आकोट हिवरखेड तेल्हारा तसेच अंजनगाव परतवाडा हे प्रमुख मार्ग बंद झाले आहे त्यामुळे वाहनधारकांना तसेच प्रवाशांना पुराचा प्रचंड त्रास होत आहे.
तालुक्यात विशेषतः सातपुडा परिसरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस झाला त्यामुळे पणज- बोर्डी परिसरातील नदी-नाल्यांना मोठा पूर आला आहे. पावसाळ्यात कधी नये एवढा पूर आल्याने रुइखेड,माडीँ सह आदिवासी बहुल गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी गेले आहे. पणज परीसरातील मुख्य मार्गावर असलेल्या नदीला महापूर आल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अंजनगाव परतवाडा हा मार्ग पूर्ण बंद पडला आहे तर हिवरखेड मार्गावरील मोहाळी नदीला पूर आल्याने हा मार्ग बंद पडला आहे काल झालेल्या पावसामुळे शेतातील पिके पूर्णतः वाहून गेली आहे हापुर पाण्याकरता परिसरातील गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे वाहतूक व्यवस्था प्रभावी झाली आहे त्यामुळे प्रवाशांनी जिथून मार्ग असेल मार्ग काढत आहेत या दोन्ही मार्गावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.