तेल्हारा (प्रतिनिधी)- स्थानिक इंदिरा नगर मध्ये अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाल्यामुळे ति दूर करण्यासाठी नगराध्यक्ष सह अधिकाऱ्यांनी वारंवार मागणी करून सुद्धा पाण्याची समस्या दूर न केल्यामुळ आज दि .८नोव्हेंबर ला तेल्हारा नगरपालिकेच्या भाजपा नगरसेविका सौ.आरती गजानन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा नगर मधून तेल्हारा नगरपालिकेवर मोर्चा निघणार आहे.
तेल्हारा शहरा मधील प्रभाग क्र.८ मधील इंदिरा नगर मध्ये पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाल्यामुळे तेल्हारा नगरपरिषदला वारंवार तोंडी सांगून,विनंती अर्ज करून ,स्मरण पत्र देऊन सुद्धा अद्याप पाणी समस्या दूर झाली नाही या बाबत एक महिन्यापूर्वीच नगर परिषद मुख्याधिकारी , नगराध्यक्ष, पाणी पुरवठा विभाग ,जिल्हाधिकारी अकोला , खासदार ,आमदार यांना मोर्च्या काढण्या बाबत माहिती दिली होती व कोणतीही कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता तरी सुध्दा नगर पालिकेने इंदिरा नगर मधील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर न केल्यामुळे आज दि .८ नोव्हेबर शुक्रवारला तेल्हारा पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती नगर परिषद सदस्या सौ.आरती गजानन गायकवाड यांनी तहसीलदार तेल्हारा व ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा यांना देण्यात आली आहे.