हिवरखेड(धीरज बजाज)- हिवरखेड येथील शैलेश कॉलनी परिसरात राहणारे सुरेश सखाराम हागे वय 52 ह्या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. सदर घटना दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा ते एक वाजताच्या दरम्यान घडल्याची माहिती. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
त्यांचे वडिलोपार्जित वारसदारांची सामाईक चार एकर शेती असून सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, आणि हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.