बोर्डी(देवानंद खिरकर)- खरीप 2017,18 सोयाबीन व उडीद या पिकांचा विमा काढला आहे.रितसर आमच्या अकोलखेड व उमरा मंडळामध्धे काढलेल्या सर्व कास्तकारांना विमा मिळालेला आहे.परंतू आम्ही 22 कास्तकार असे आहोत की आम्हाला 17 महिनेचा कालावधी उलटूनही आज परंत सुध्धा खरीप 2017,18 चा विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही.
तसेच आम्ही नेशनल ईन्शूरन्स कंपनी,गांधि रोड अकोला व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखा अकोला व कृषी अधिक्षक साहेब व जिल्हाधिकारी साहेब तसेच पालकमंत्री साहेब,आमदार,खासदार,तहसीलदार यांना वारंवार निवेदन देवून व प्रत्यक्ष भेटून सतत पाठपूरावा करुन सुध्धा आम्हाला खरीप 2017,18 ची विम्याची रक्कम अद्यापही मिळालेली नाही.
तरी आपण वरील विषयाची दखल घेवून आम्हाला विम्याचा लाभ मिळवुन देण्याची कृपा करावी.हिच विनंती अश्या आशयाचे निवेदन दि.3/11/2019 रोजी मा.मुख्यमंत्री साहेब यांना देण्यात आले आहे.व त्याच्या प्रतिलीपी जिल्हा कृषी अधिक्षक,जिल्हाधिकारी खासदार,आमदार सर्वांना देण्यात आल्या आहेत.