अकोला, दि.4 (जिमाका)- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या मुर्तिजापूर तालुका भागाची आज पालकमंत्री ना.डॉ. रणजीत पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देऊन नुकसानभरपाई मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले.
आज सकाळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मूर्तिजापूर तालुका भागात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी विरवाडा, मुंगशी, सांगावा मेळ, पारद, भटोरी, शेलु बोंडे, लाखपूरी या गावातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. प्रत्यक्ष शेतात जाऊन पिक पाहणी केली. नुकसान झालेले सोयाबीन, ज्वारी, कपाशी या पिकांची स्थिती पाहिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना विमा परतावा, तसेच नुकसान भरपाई देण्याबाबत आश्वस्त केले.
याप्रसंगी तहसीलदार प्रदीप पवार उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी उपस्थित शासकीय यंत्रणांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देशही दिले.