तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकाची प्रचंड नासाडी झाली असुन शेतकरी पुर्ण पणे खचुन गेला असुन शेतकऱ्यांना आधाराची गरज पाहता शासनाने नुकसान भरपाई पोटी एकरी २५ हजाराची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तेल्हारा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील ढोले यांनी केली आहे.
तालुक्यात पेरणी पासुन तर काढणी पर्यंत तेल्हारा तालुक्यात पावसाचे थैमान सुरुच राहीले आक्टोबर अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकाची प्रचंड हाणी झाली दिवाळी दिवसांत शेतकऱ्यांच्या घरात कापुस ज्वारी सोयाबीन तिळ मुग उडीद आदी पिकाची रेलचेल असते त्यामुळे घरात आलेले पिक विकुन दिवाळी साजरी करतात मात्र यावर्षी सर्वच पिके पाण्याखाली सापडुन उध्दवस्त झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. आपल्या मुलाबाळांना दिवाळीचे कपडे व सासर वरुन माहेरी आलेल्या मुलीना साळी चोळी घेण्याची सोय नसल्याने शेतकऱ्यांवर डोळे पाणावल्याची परिस्थिती निर्माण झाली एवढी भयंकर परिस्थिती कधीच उदभवली नसुन शेतकऱ्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना तातडीने एकरी २५ हजाराची मदत द्यावी गेल्या वर्षी चा हरभरा गहू आदी पिकाचा विमा व यावर्षीचा कापुस मुग उडीद सोयाबीन ज्वारी आदी पिकांचा विमा देखील तात्काळ देण्यात यावा दुष्काळ निधी देखील अधाप शेतकऱ्यांना मिळाला नाही अशी मागणी अतुल पाटील ढोले यांनी शासनाकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे.