अकोला(प्रतिनिधी)- महायुती भाजप-शिवसेना तसेच भाजप उमेदवारांच्या प्रचारात विरोधात प्रचार करून पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य अक्षय लहाने महानगरपालिकेतील नगरसेवक आशिष पवित्रकार यांना चंद्रकांत दादा पाटील यांनी पक्षातून निलंबित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिली आहे .
विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अक्षय लहाने पक्षविरोधी कारवाया करीत असल्याची तक्रार मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी पक्षाकडे केली होती त्यांच्या तक्रारीनुसार जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी सहा वर्षाकरिता अक्षय लहाने यांना पक्षातून निलंबित करण्याची कारवाई केली होती तसेच मनपातील नगरसेवक आशिष पवित्रकार यांच्या बाबतीत सुद्धा असाच काही प्रकार घडून येत आहे अशा तक्रारी मिळाल्यामुळे त्यांनासुद्धा सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याची कारवाई किशोर मांगटे नगर अध्यक्ष यांनी केली होती याबाबतीत आशिष पवित्रकार आणि अक्षय लहाने चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करून सविस्तर बाजू मांडली त्यावर चंद्रकांत पाटील यांचे दोन्ही सदस्य बाबत यांच्या निलंबनाच्या कारवाईबाबत स्थगिती दिल्ली याबाबतीत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना पुढील तपास पूर्ण करण्याचे आणि माहिती गोळा करण्याचे निर्देश पत्रद्वारे कळविले आहेत .
निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणजे भाजप—आशिष पवित्रकार
मागील आठवड्यात मला कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय आणि बाजू मांडण्याची संधी न देता निलंबित केल्याची बातमी कळली होती तेव्हाच वरिष्ठांकडे माझी बाजू मांडायचे ठरवले होते त्या प्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडे आणि पक्षनेतृत्वाकडे मी बाजू मांडली आणि हे निलंबन म्हणजे माझ्यावर अन्याय आहे हे सिद्ध केले असता त्यांनी त्वरित माझ्या निलंबनाची कारवाई स्थगित करून स्थानिक नेतृत्वाला याबाबत पुढील योग्य ती प्रकिया करण्याबाबत आदेश दिला आणि तसे पत्र जाहीर केले.
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची बाजू ऐकून योग्य न्याय केल्याबद्दल मी मा मुख्यमंत्री महोदय प्रदेशपक्षाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि रणजीतदादा पाटिल पक्षाचे आभार मांडतो आणि दुप्पट ऊर्जेने पक्ष आणि संघटना वाढीच्या कामास लागतो.