तेल्हारा(प्रतिनिधी)- अकोट मतदारसंघात स्थानिक उमेदवार मिळावा यासाठी तेल्हारा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी स्थानिकचा मुद्दा धरून मागणी केली होती मात्र पक्षाने स्थानिक उमेदवार न दिल्याने तसेच विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या विरोधात गेलेल्या तेल्हारा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची नाराजीचा सूर मुंबई पर्यन्त पोहचल्याने मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका भाजपला बसण्याची शक्यता असल्याकारणाने भाजपा पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी अकोला भाजपा जिल्हाध्यक्ष तेल्हारा येथे आज 3 च्या सुमारास येणार असून कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून त्यावर तोडगा कसा निघेल याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी यांच्या नाराजी असल्याने पदाधिकारी आमदार भारसकळे यांच्या काम करण्यास उत्सुक नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने भाजपला मतदारसंघात झटका न बसावा यासाठी जिल्हाध्यक्ष तेल्हारा गाठत असल्याचे बोलल्या जात आहे.