तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तेल्हारा ते वाडी अदमपूर मार्गा दरम्यान दोन गटात अंतर्गत वादातून तीन जणांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याने अकोला येथे हलवण्यात आले.यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून दोन मोटारसायकल घटनास्थळी जप्त करण्यात आले आहेत पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.