अकोला(प्रतिनिधी)- अकोला भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य ,माजी महानगर अध्यक्ष डॉक्टर अशोक ओळंबे यांना सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती अकोला जिल्हा महानगर अध्यक्ष किशोर पाटील यांनी दिली आहे .भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार गोवर्धन शर्मा यांच्याविरोधात पहार संघटनेच्यावतीने डॉक्टर अशोक ओळंबे यांनी नामांकन पत्र दाखल केले आहे पक्षाने पाच वर्ष नगरसेवक व पंधरा वर्षे महानगराध्यक्षपदी तसेच पाच वर्ष सत्तेचे फडकणारे लाल दिव्याच्या गाडीत फिरणाऱ्या डॉक्टर ओळंबे यांना आता कार्यकर्त्यांची चिंता कशाला लागली असावी प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे पक्षविरोधी कारवाई ची दखल व निवडणूक काळात मिळालेल्या अधिकाराचा अंतर्गत महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद मध्ये बंडखोरांची गय केल्या जाणार नाही असा इशारा दिला आहे त्यानंतर ही ताबडतोब कारवाई करण्यात आली आहे