तेल्हारा (प्रतिनिधी)- आकोट विधानसभा मतदारसंघातिल समस्यांनबाबत व तेल्हारा तालुक्यातील बटालियन, रस्ते व पाण्याच्या पळवापळवी बाबत स्थानिक भागवत मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या निर्धार सभे मध्ये आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या विरोधात संतप्त झालेल्या नागरिकांनी रोष व्यक्त करून पार्सल उमेदवार हटविन्या बाबत जवळपास एक हजाराच्या वर नागरिकांनी शपथ घेऊन निर्धार केल्याचे दिसून आल्याने मतदार संघातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
आकोट विधानसभा मतदारसंघात स्थानिकच्या मुद्द्यावरून या पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एल्गार पुकारून भाजपा पक्षश्रेष्ठी कडे स्थानिक उमेदवार देण्यात यावा आमदार भारसाकळे व्यतिरिक्त पक्षा तील कोणीही चालेल अशी मागणी लावून धरली होती. तरी सुद्धा भारसाकळे यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षातील तो असंतोष दूर होत नाही. तर आकोट विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांबाबत त्या मध्ये तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास तसेच तालुक्यातील तळेगांव येथे मंजूर झालेला भारत राखीव बटालियन कॅम्प अकोला तालुक्यातील सिसा उदेगाव, हिंगणी शिवारात पळविण्यात आला. तसेच वान धरणातील हक्काचे पाणी अकोला करिता आरक्षीत करून पाणी सुध्दा पळविण्यात आल्याने व या पळवापळवी मुळे मतदार संघातील शेतकऱ्यांनच्या सिचनाचा प्रश्न निर्माण झाला.
बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला बटालियन कॅम्प पळविल्यामुळे अनेक युवकांना रोजगारा पासून वंचित राहावे लागले. या सर्वांना कारणीभूत आमदार प्रकाश भारसाकळे असल्याचे अनेकांनी आपल्या भाषणातून सांगितले. कारण या सर्व गोष्टीवर आमदार भारसाकळे यांनी लक्ष न दिल्यामुळे मतदार संघाची ही अवस्था झाली असल्याबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया आयोजित निर्धार सभेत अनेकांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केल्या निर्धार सभेला उपस्थित जवळपास एक हजाराच्यावर नागरिकांनी पार्सल म्हणून आमदार भारसाकळे यांना हटविण्या बाबत तसेच स्थानिक, हक्काचा व आपला माणूस निवडून आणण्यासाठी सामूहिक हात वर करुन शपथ घेतली. यामुळे मतदार संघातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तविल्या जाते. या वेळी निर्धार सभे मध्ये जिल्हा परिषदेच्या माजी सभापती डॉ.संजविनी बिहाडे, तेल्हारा पालिकेचे माजी अध्यक्ष दयालसिह बलोदे, ऍड.सुधाकर खुमकर,एड, गजानन तराळे,प.स.चे माजी सभापती अतुल ढोले, शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड,माजी तालुका प्रमुख शंकरराव ताथोड, राजेश खारोडे,राजेश वानखडे, जनार्धन चतारे, प्रफुल्ल दबडघाव, चंद्रकांत मोरे, इत्यादी मान्यवरांनी आगामी विधानसभा निवडणुकी बाबत आयोजित निर्धार सभे मध्येआपले विचार व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा.सचिन थाटे यांनी केले तर प्रास्ताविक रामभाऊ फाटकर यांनी केले आयोजित निर्धार सभेला मतदार संघातील विविध राजकीय पक्षांनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक एक हजाराच्या वर मोठया संख्येने उपस्थित होते