बाळापूर (शाम बहुरूपे): दि२.बाळापूर शहरातील बडा मोमीनपुरा भागात बिबट्याच्या हल्ल्यात, मोहम्मद हनिफ व मोहम्मद अदनान हे दोघे जखमी झाले. ही घटना आज पहाटे बडा मोमीनपुरा परिसरात घडली तर या बिबट्याने परिसरातील काही घरांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. रहिवासी परिसरात बिबट्या घुसल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. यावेळी बाळापूर पोलिसांकडून वन विभागाला माहिती देण्यात आल्या. नंतर वन विभागाचे कर्मचारी तात्काळ बाळापूर येथे पोहोचले आणि बिबट्यास जेलबंद करण्याचे प्रयत्न सुरू केले. अमरावती येथील वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावण्यात आले . बाळापूर पोलिसांनी प्रसंगाच गांभीर्य ओळखून तात्काळ ठाणेदार नितीन शिंदे आपल्या ताफ्यासह बडा मोमीनपुरा परिसरात पोहचले आणि चोख बंदोबस्त केला यावेळी वन विभागाचे अकोला अमरावती पथक देखील आले होते. वन विभाग पथकाने बिबट्याला जेलबंद केले.