अकोला (प्रतिनिधी)- नोटाबंदीला जवळपास अडीच वर्षपूर्ण झाल्यानंतर देशातील अनेक राज्यात पुन्हा एकदा चलन तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगना, कर्नाटक, बिहार आणि मध्यप्रदेशात चलन तुटवड्याचा सर्वाधिक परिणाम दिसत आहे. एटीएममधून काढण्यात आलेल्या दोन हजाराच्या नोटा पुन्हा चलनात येत नसल्याने बँक अधिकारीही चक्रावून गेले आहेत.
ब्लॅकमनी व्हाइट करण्यासाठी या नोटांचा वापर केला जात असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. आकाराने छोटी पण, देशातील सर्वाधिक मूल्य असलेली दोन हजाराची नोट अचानक चलनातून गायब झाल्याने या नोटा ब्लॅकमनीसाठी वापरल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारत सरकारने नोटबंदीच्या काळात आलेली व हजाराची नोट लोकांना अडचणीची ठरत होती, मात्र तीन वर्षांनंतर दोन हजाराच्या नोटेची छपाई कमी केल्याचे आलेल्या दोन हजाराच्या नोटेच्या तुटवड्यावरून दिसून येते आहे. यावर्षी वापरात असलेल्या नोटांची संख्या 329 कोटींवरून 7.2 कोटीपर्यंत खाली आली आहे. मात्र दोन हजाराच्या नोटीचा तुटवडा हा कृत्रिम तुटवडा आहे हे तितकेच खरे.