तेल्हारा (प्रतिनिधी)- गौतमा नदीच्या पुरामुळे व सततसुरु असलेल्या पावसामुळे गौतमा नदी पात्राशेजारी राहणाऱ्यां सहा ते सात घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्याची घरे जमीनदोस्त झाली असून त्याचे प्रत्येकी विस हजाराचे अंदाजित नुकसान झाले असुन त्यांचे कुटुंबीय उघडल्यावर आले आहे. याबाबत संबंधित घर मालकांनी तेल्हारा तहसिलदार यांचेकडे माहीती दिली असुन तलाठी रुढे यांनी घरांची पाहणी करून पंचनामा केला आहे. शहरातील तकीया भागातील हे रहीवाशी कुटुंब असुन मोलमजुरी करून आपल्या प्रपंच चालवित होते. परंतु तेल्हारा तालुक्यात व शहरात सुरु असलेल्या तुफान पावसामुळे गौतमा नदी पात्राला पुराने वेढा घातला त्यात नदी पात्राशेजारी राहणारे इसुफशहा जमालशहा, शकेराबी महंमद शहा, गफारशहा रहेमातुल्लाशहा, सुलेमानशहा दाऊद शहा, सर्वलशहा तुराफशहा, रफातुल्लाशहा शफातुल्लाशहा, शौकतशहा, शफातुल्लाशहा, यांचा घर पडलेल्या मध्ये समावेश आहे या प्रकारामुळे वरील कुटुंबीय उघडल्यावर आले असुन शासनाने त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे