अकोट (देवानंद खिरकर)- आज अकोट येथे प्रहार पदाधीकार्यांची बैठक संपन्न झाली. अकोट मतदार संघामध्ये असंवेदनशील लोकप्रतिनिधि मिळाल्यामुळे अकोट मतदारसंघामधे विकास नावाला सुधा शुल्क राहिला नाही. गल्ली पासुन ते दिल्ली परेंत सत्ता आल्यावर सुध्धा अकोट मतदार संघामध्ये रस्ते नाहित, शेतकर्याच्या प्रश्नावार आमदार कधी बोलत नाही. शेतकर्यांच्या हक्काचे पाणी सत्तधार्यांनी पळवले, युवकांना रोजगार नाही, नाफ़ेड सुरु होत नाही, आमदारांना शोधून सुध्धा आमदार दिसत नाही, जाती धर्माच्या नावावर निवडुन यायच, विकासाच्या भुलथापा ध्यायच्या एवढाच उद्योग राहिला आहे. प्रशासकीय यंत्रणा एवढी मुजोर झाली आहे की शंभरवेळा कार्यालयाच्या चकरा मारुन सुध्धा काम होत नाही. त्यामूळे या वेळेस सत्ताधारी आमदाराला धडा शिकवणे आवश्यक आहे. त्या साठी प्रहारची उमेदवारी आहे, असे मत तुषार फुंडकर यांनी व्यक्त केले आहे. दि.3/10/2019 ला पक्षप्रमुख वंदनिय बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अग्रेसन भवन खबुतरी मैदान येथून ठिक 11 वाजता अर्ज भरण्यासाठी रैली निघणार आहे. तरी सर्वांनी उपस्थीत राहण्याची विनंती शहर प्रमुख सागर उकर्डे तसेच विक्की मल विरोधी पक्षनेते नगर परिषद तेल्हारा यांनी केले आहे.