अकोला (प्रतिनिधी): अकोला शहरातील सुरू असलेल्या रस्ते व उड्डाणपूल बांधकामा मुळे शहर वाहतूक कर्मचाऱ्यांना वाहतूक नियंत्रित करतांना तारे वरची कसरत करावी लागत आहे. अकोला शहरातील मुख्य वाहतुकीचे मार्ग असलेला जेल चौक ते टॉवर चौक हा मार्ग उड्डाणपूल बांधकामा मुळे व नेकलेस रोड हा नवीन सिमेंट रोड बांधकामा मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्या मुळे शहर वाहतूक शाखेवर वाहतूक नियंत्रित करण्याची मोठी जबाबदारी आहे, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजे पर्यंत तर काही पॉईंट वर रात्री 10 वाजे पर्यंत सतत कार्यरत असतात. अश्यातच पडणाऱ्या सतत च्या पावसा मुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या मुळे आणखी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशोक वाटिका चौकात असाच एक भला मोठा खड्डा अपघातास निमंत्रण देत होता. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करीत होतो. हे हेरून आज त्या ठिकाणी ड्युटी बजावीत असलेल्या ज्ञानेश्वर चिकटे, व रघुनाथ ढोरे ह्यांनी इतर कुठल्या शासकीय विभागावर विसंबून न राहता आज 2 मजूर लावून सदर मोठा खड्डा बुजवून वाहतुकीस होणारा अडथळा दूर केला.