पातूर (सुनील गाडगे)- पातूर पोलीस ठाण्यात दुर्गा उत्सव संदर्भात महत्वपूर्ण आढावा बैठक झाली. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डॉ. रोहिणी सोळंके यांनी दुर्गा मंडळांनी आपले अर्ज ऑनलाइन करण्याचे आवाहन केले आहे आणि हा उत्सव गणपती उत्सव साजरा केला तसा दुर्गा उत्सव साजरा करण्याकरीता दुर्गा मंडळ यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी सूचना, रस्त्यावरील गड्डे ,विद्युत, वाहतूक व्यवस्था आदी बाबत बैठक मध्ये चर्चा झाली आणि पाठपुरावा केला जाणार आहे अशी ग्वाही पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या बैठकीला जेष्ठ पत्रकार शंकरराव नाभरे, पत्रकार देवानंद गहिले, ठाणेदार गजानन गुल्हाने, पोलिस उपनिरीक्षक गणेश नावकर आदी मंचावर उपस्थित होते. बैठकीत शंकरराव नाभरे, देवानंद गहिले, प्रा.सि. पी.शेकूवाले, पत्रकार डिगांबर खुरसडे यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक तथा सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन ठाणेदार गुल्हाने यांनी केले. बैठकीला सासचे दुलेखान, प्रवीण पोहरे, अजय ढोणे, शंकर देशमुख, राहुल शेंगोकार, संतोष राऊत ,गजानन गाडगे ,कृष्णा ंबोबटकर, बब्बू भाऊ ,यासह शहरातील विविध दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते.