अकोला (सुनिल गाडगे ): राज्यशासनाने समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना डावलून त्याच्या ऐवजी ए.एन.एम. डी.फार्मसी ही शैक्षणिक पात्रता असलेल्या युवकांना आदिवासी विभागाद्वारे तुघलकी व निषेधार्थ आदेश काढल्याने सरकार विरोधात संबंधित अध्यादेश रद्द करण्यासाठी “अकोला जिल्हा समाजकार्य कृती समितीच्या” वतीने जिल्हाधिकारी आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, अकोला यांना निवेदन देवून लक्ष वेधण्यात आले.
अकोला शहरातील श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी व पदव्युत्तर झालेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत कृती समिती स्थापन करून संबंधित विभागाने काढलेला नोकर भरतीचा अध्यादेश रद्द करून समाजकार्य विषयातील बेरोजगार युवकांना न्याय व हक्कासाठी ही कृती समिती लढा देणार असुन याविषयी त्रिव असे राज्यव्यापी आंदोलन उभारणार आहोत असे अकोला जिल्हा समाजकार्य कृती समितीचे शुभम पाटील काजे यांनी सांगितले.
अकोला जिल्हा समाजकार्य कृती समितीच्या वतीने 300 स्वाक्षरी सह निवेदन देण्यात आले. यावेळेस कृती समिती सदस्य आदी उपस्थित होते.
या आंदोलनास/निवेदनास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सह विविध विद्यार्थी संघटनेचा पाठिंबा