अकोला(प्रतिनिधी)- शासनाच्या प्रत्येक विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली असून कुठून मलिदा भेटणार याकडे त्यांचे लक्ष असते त्यात पोलिस विभाग अव्वल असून कारवाई मधील जप्त माल परत देण्यासाठी लाच मागणारा मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचा हवालदार लाच घेताना ए सी बी च्या जाळ्यात फसला असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
मूर्तिजापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला पोलीस हवालदार कैलास त्रंबक कळमकर वय ४६ रा नागे ले आऊट कौलखेड अकोला याने तक्रारदार याच्या पानपट्टी मधील जप्त माल परत करण्यासाठी हवालदाराने पाच हजार रुपयांची मागणी तक्रारदार याला केली होती त्यानुसार तक्रारीपूर्वी दोन हजार घेऊन बाकी असलेले तीन हजार रुपायांपैकी दोन हजार लाच आज रोजी सायंकाळी स्वीकारत असताना ए सी बी च्या जाळ्यात तो फसला मुर्तिजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून आरोपी कैलास कळमकर ला ताब्यात घेण्यात आले आहे.सदर कारवाईश्रीकांत धिवरे,
पोलीस अधिक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र अमरावती.
मा. श्री. पंजाबराव डोंगरदिवे, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र,अमरावती, पो.उप.अधिक्षक श्री एस एस मेमाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी- पो.निरीक्षक, ईश्वर चव्हाण, ला.प्र.वि.अकोला व
कारवाई पथकातिल पो.निरीक्षक ईश्वर चव्हाण, पोहवा,गजानन दामोदर,ना.पो.कॉ.अनवर खान, पंच,ला.प्र.वि.अकोला यांनी केली