तेल्हारा (विलास बेलाडकर)- तेल्हारा तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे गाडेगाव ग्रामपंचायत मधिल नाट्यमय घडामोडीत सरपंच श्री प्रमोद ज्ञानदेव वाकोडे यांना विभागीय आयुक्त अमरावती यांनी दि 03/08/2019 रोजीच्या आदेशाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959कलम39(1) अन्वये सरपंच पदावरून अपात्र घोषित केले होते. त्या विरुध्द सरपंच श्री प्रमोद वाकोडे यांनी ग्राम विकास राज्यमंत्री मंत्रालय मुंबई यांच्या दालनात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39(3)अन्वये सदर आदेशा विरूध्द अपिल दाखल केलेली आहे. तसेच सदर अपिलसोबत आदेशाला अंतरिम स्थगिती देण्याबाबत अर्ज सुध्दा दाखल केला आहे. अपिलार्थी प्रमोद वाकोडे यांनी वारंवार प्रयत्न करूनही ग्रामविकास राज्यमंत्री यांच्या दालनात अपिल मधिल स्टे अर्जावर सुनावणी घेण्यात आली नाही. सरतेशेवटी सरपंच प्रमोद वाकोडे यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे रिट याचिका क्रमांक 6346/2019ही दाखल केली त्यामध्ये वि उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी दि 20/09/2019रोजी आदेश पारीत करुन गाडेगाव सरपंच श्री प्रमोद वाकोडे यांना न्यायालयाच्या पुढिल आदेशापर्यतं सरपंच पदी कायम ठेवण्याचा आदेश पारीत केला आहे. त्यामुळे सरपंच श्री प्रमोद वाकोडे यांच्या समर्थकांमध्ये आनंदानचे वातावरण निर्माण झाले आहे.