अडगांव बु. (दिपक रेळे)- हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दी परिसरात व अडगाव बु गावात गेल्या बऱ्याच दिवसां पासून अवैध धंद्याने तोड बाहेर काढले असल्याने अवैध धंद्यात बिट जमदाराच्या आआशीर्वादाने गावातील मुख्य काळी पिवळी स्थानक, जिल्हापरिषद शाळा, चंडिका चौक, शिवाजी चौक,मळी, सोनवाडी फाटा, भीमनगर, इंदिरा नगर अशा अनेक गल्ली गल्ली मध्ये अवैध धंदे निर्माण होत आहेत. व या अवैध धंद्यांना बिट जमदाराचा आशीर्वाद सहकार्य असल्याने अवैध धंद्यांन वाले सामान्य नागरिकांनवर दादागिरी करत असतात. भीती पोटी सामान्य जनता अवैध धंद्यांनवाल्याच्या दादागिऱ्या ना इलाजाने सहन करतात. गावा मध्ये अवैध धंदे करण्यासाठी बिट जमदाराचा आशीर्वाद असल्याने हिवरखेड मध्ये कितीही मोठं मोठे अवैध धंदे करता येता व सध्या अवैध दारू, गाजा, सागवान, वरली मटका, अवैध मास, गुटखा, तितली भवरा, आंबट शौकीन तसेच या पूर्वी चरस सारख्या अवैध व्यवसाचा धंदा पार पडला, या अशा प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांनचे आरोग्य धोक्यात येत आहे, या विषयाकडे वरिष्ठ पोलीस प्रशाशनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. या गंभीर प्रकाराकडे पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ लक्ष देऊन गावातील अवैध धंदे बंद करावे अशी मागणी सुजाण नागरिक करीत आहे.