तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा येथील इंदिरा नगर मधील आईचे निधन झालेले 9 वा वर्ग पास झाल्यानंतर अतिशय भीषण दारिद्र्यामुळे शाळेत जाने बंद केलेले कु.सुषमा व अविनाश शेषराव गवारगुरु या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार लोकजागर मंचने उचलला असून त्यांच्या पुस्तक, लेटरबुक, फी, ट्युशन सहित सर्व खर्चाची जबाबदारी लोकजागर मंचचे संस्थापक श्री अनिलभाऊ गावंडे यांनी स्वीकारली आहे. शिक्षणाची आवड असलेला कोणताही विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचीत राहू नये या उद्देशानेच लोकजागर मंच अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत व सहकार्य करीत असते. आपल्या मुलांना केलेल्या या मदतीबद्दल या विद्यार्थ्यांनी आणि त्यांचे वडील शेषराव गवारगुरु यांनी अनिलभाऊ गावंडे आणि लोकजागर मंचचे आभार मानले आहेत. यापूर्वी सुद्धा लोकजागर मंचने हिवरखेड येथील बि.एस.सी. द्वितीय वर्षाला शिकत असलेल्या मुस्लिम समाजाच्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्वं स्वीकारले होते हे विशेष.