भांबेरी (योगेश नायकवाडे)- भांबेरी गावात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 12 वी पर्यंत शाळा उपलब्ध आहे आणि 12 वी नंतर शिक्षणासाठी तेल्हारा येथे जावे लागते. तसेच शाळेचा टाइम हा 11 ते 12 मध्ये असल्या कारणाने भांबेरी मधून तेल्हारा जाण्याकरिता 10.30 वा बस असते व विद्यार्थ्यांना येण्याकरिता ४.30 वा ची बस असते. पण या बस वर जेष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी यांची जास्त प्रमाणात गर्दी असल्या कारणाने बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना पास असूनही खाजगी बस बसने प्रवास करावा लागत होता. पण १८/०९/१९ रोजी तेल्हारा ते भांबेरी बस भांबेरी मध्ये येत असताना शेगाव नाका तेल्हारा येथे बस कंडक्टर यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना चढण्यास मनाई केली त्यामुळे विद्यार्थी आणि बस कंडक्टर याच्यात बोलाचाली झाली. तरीही विद्यार्थ्यांनी सहन केले. परंतु काल दि. १९/०९/१९ रोजी बस सकाळी 10.30 वा भांबेरी येथे आली असता बस मध्ये जैसथे परिणाम दिसल्यामुळे विद्यार्थ्यांनी खवळून बस रोकून ठेवली आणि जोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना बस ची व्यवस्था केली जाणार नाही तोपर्यंत बस भांबेरी मधून जाऊ देणार नाही असे सर्व विद्यार्थ्यांनी बस चालक यांना ठणकाऊन सांगितले. त्यामुळे बस चालक यांनी बस डेपो व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून तेल्हारा ते भांबेरी बस वाढवण्यात आली.