तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयातील एनसीसी युनिट बंद पडल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी दि 19/09/2019 रोजी महाविद्यालयातील प्राचार्य यांना निवेदन दिले आहे. तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासाठी डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय ही एकमेव मोठी शिक्षण संस्था म्हणून आहे. परंतु या महाविद्यालयातील एनसीसी युनिट मागील 2017 ते 2018 सत्रा पासून बंद झाले आहे. या महाविद्यालयातील एनसीसी युनिट बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या एनसीसी प्रमाणपत्र चे मोठ्या प्रमाणावर फायदे विद्यार्थ्यांना आहे. भारतीय सैन्य भरती, पोलिस भरती, मध्ये एनसीसी प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांना विशेष सवलती आहेत. या महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील असून भारतीय सैन्य भरती, पोलिस भरती, मध्ये तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत.
परंतु महाविद्यालयात एनसीसी युनिट बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थी एनसीसी पासून वंचित होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना होणार्या सैन्य भरती , पोलिस भरती , होमगार्ड भरती मध्ये विद्यार्थ्यांनाचे मोठे नुकसान होणार आहे. त्याच बरोबर एनसीसी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनाचा सर्वांगीक विकासाला चालना मिळते. आज महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यानी प्राचार्यची भेट घेऊन निवेदन देण्यात आले यावेळी प्राचार्यनी त्वरित निवेदनाची दखल घेत आवशयक कागद पत्राची पूर्तता व पाठपुरवा करून लवकरात लवकर महाविद्यालतील एनसीसी युनिट सुरू करण्यात येईल असे विद्यार्थ्यांना आश्वासन दिले यावेळी शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.