अकोट (प्रतिनिधी)- अकोट, अकोला रस्त्याचे चौपाद्रीकरनाचे काम गेल्या अडीच तीन वर्षांपासून सुरू असून संथ गतीने सुरू असलेल्या या रस्त्याची कामाची गती गेल्या काही वाढली नाही. अशात मात्र गेल्या दोन वर्षांपासून वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारक शेतरस्ता परवडला मात्र हा नको अशी प्रतिक्रिया देत आहेत. सद्या जिल्ह्यात सर्वात बिकट परिस्तिथी बघितली तर अकोट अकोला रस्त्याची असून हा रस्ता मोठ्या रहदारी आणि वाहतुकीचा आहे. या रस्तावरून हजारो वाहने ये जा करीत असतात रस्त्याच्या चौपाद्रीकरकर्णाचे काम हे संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना पावसाळ्यात चांगलीच कसरत करीत जीव मुठीत धरून घर गाठावे लागते. सदर रस्त्यावर अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जणांना अपंगत्व सुद्धा आले तर काहींना मणक्याचे आजार जडले आहेत. या रस्तावर अनेक वेळा वाहन स्लिप होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन अपघात होत आहेत तर दुचाकीस्वार तर काही ठिकाणी दुचाकी लोटून मार्ग काढतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असताना मात्र लोकप्रतिनिधी कुठलाच पुढाकार घेऊन ही समस्या लवकर कशी लागणार आणि रस्ता लवकर पूर्ण करण्यासाठी पुढाकार कधी घेणार जेणेकरून होणार त्रास थांबेल.