वाडेगांव (डॉ. चांद शेख)- पाण्याच्या पाईप लाईन मधील लिकेज काढण्यासाठी वाडेगांव ग्राम पंचायत मार्फत मेन रोड, तसेच बाळापूर पातूर रोड वर जागोजागी मोठ मोठे जिवघेने खड्डे खोदण्यात आले आहे. जवळपास पंधरा दिवसा पासून खड्डे खोदण्यात आले आहे. जर या खडयात ऐखादी व्यक्ती किंवा गाडी जाऊन पडली तर याला जबाबदार कोन राहाणार अशी गावकऱ्यात चर्चा आहे. या लिकेज पाहाण्याचे काम मंद गतीने होत आहे अशा गावकऱ्यांचा म्हणणे आहे. तरी ग्राम पंचायत प्रशासनाने या कडे लक्ष देऊन लवकरात लवकर लिकेज काडून खडडे बुजवावे कारण या रस्त्याने शाळेचे विद्यार्थी, गावकरी येजा करीत असतात, कोणत्या प्रकारचा अपघात होणार नाही याची काळजी ग्राम पंचायत प्रशासनाने घ्यावी व खडयाच्या बाजुला सुरक्षा कटडे लावण्यात यावे जेने करून कोणता अपघात होणार नाही. काम जलद गतीने करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे
प्रतिक्रिया:
सरपंच सौ. अन्नपुर्णा मानकर
गावातील तसेच मेन रोडवरील नळ योजने ची पाईप लाईन मध्ये जागो जागी लिकेज असल्या कारणा मुळे नेमका लिकेज कोठे आहे हे सापडत नाही. कारण ज्या ठिकानी पाणी लिकेज दिसतो त्या जागी खड्डा केला की त्या ठिकाणी लिकेज सापडत नाही, आणि दुसऱ्याच जागी लिकेज सापडतो म्हणून वेळ लागत आहे . तरी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करावे ही विनंती.