बाळापूर(प्रतिनिधी) –आज बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या वाहनाला पाठी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने वाहनात बसलेले गटविकास अधिकारी ओ. टी. गाठेकर यांच्यासह पंचायत समीतीचे लेखाधिकारी नरेंद्र राऊत, विस्तार अधिकारी आर के देशमुख व कर्मचारी साखरकर जखमी झाले आहेत. हि घटना आज गुरुवारी दुपारी तीन वाजता घडली.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आज दुपारी शासकीय वाहनातून बाळापूरकडे कर्तव्यावर निघाले होते. अकोल्याहून अधीकारी व कर्मचारी बाळापूर कडे येत असताना पारस फाट्यानजीक त्यांचे वाहन पोहोचताच पाठी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये उपरोक्त तीन अधिकारी जखमी झाले तर यापैकी लेखाधिकारी साखरकर किरकोळ जखमी झाले आहेत. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले असून अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.