हिवरखेड (प्रतिनिधी)- हिवरखेड तालुका तेल्हारा जिल्हा अकोला येथिल भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. बाळासाहेब नेरकर हे सर्वसाधारणपणे 1980 पासुन आजपर्यंत पक्षात आहेत. त्यांनी भारतिय जनता पक्षाचे जिल्हा पातळीवर अनेक पदे भुषवली आहे. 3 दशकांच्या पासुन जमिनीवरचा कार्यकर्ता हा जमिनीवरच आहे. सर्व सामन्यांच्या सेवेसाठी सदैव हसतमुख आहे. बाळासाहेबांची नाळ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यच्यासी जुळली आहे. बाळासाहेब यांनी भारतीय जनता पक्षाकडे येणार्या विधानसभा आकोट मधून उमेदवारी मागितली आहे. तसी त्यांनी भाजपा चे सुधिरजी मुंगतिवार यांच्या कडे पक्ष कार्यालय अकोला येथे मुलाखत दिली. देबुजी युथ बिग्रेड महाराष्ट्रच्या महाअधिवेशनात दिनांक 15.09.2019 रोजी ओम्ं नगर वालज़ाडे मंगल कार्यालय पंचावटी नाशिक येथे समाज गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आहे. पुरस्कारात सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र शील्ड़ देऊन समाजाचे मुंबईचे प्रसिध्द उधोजक श्री रमाकांत सेठ कदम, संस्थापक अध्यक्ष यांचे देबूजी युथ बिग्रेड राहुल वरन्कार यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्रचे जेष्ठ समाज संघटक श्री बोरसे गुरुजी, .ह.भ.प. उमेश महाराज, आर्या महाराष्ट्र मार्गदर्शक विश्वनाथ राऊत, सत्यनारायण आर्या.नितीन रनसींगे. प्रदेशच्य रनरागिणी अध्यक्ष रानी ताई तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व तमाम महाराष्ट्रतुन आलेल्या युथ बिग्रेचे कार्यकर्ते व शाम वाघ प्रतिनिधी पत्रकार सुधीर शमतकार ननावरे, अनिल जाधव, महाराष्ट्र भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण धोबी व ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्री बाळासाहेब नेरकर यांना समाज सेवक समाज गौरव पुरस्कार शील्ड़ व प्रमाणपत्र देऊन गौरविन्यात आले.