पातुर(सुनील गाडगे)- पातूर शहरातील वाल्मिकी समाजाचे युथ आयकॉन असलेले व पूर्वी शिवसेनेत कार्यरत असलेले विनोद तेजवाल यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शासकीय विश्राम गृह पातूर येथे झालेल्या बैठकीत वंचीत बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. श्री.विनोद तेजवाल हे वंचीत बहुजन आघाडीच्या निर्भय पोहरे यांच्याशी बरेच दिवसापासून संपर्कात होते व पोहरे यांनी बाळासाहेबांची नेमकी भूमिका समजावल्याने व ती आपल्याला पटल्याने मी आद. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली निस्वार्थी पणाने वंचीत बहुजन आघाडीत काम करण्यास तयार आहो व लवकरच जास्तीत जास्त समाजबांधवांना वंचीत बहुजन आघाडीचे धोरण समजावून प्रवेश करवून घेइन असे श्री. विनोद तेजवाल यांनी सांगितले. यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाअध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे, महासचिव दीनकर वाघ, सचिव सुरेन्द्र तेलगोटे, प्रसिध्दीप्रमुख सचिन शिराळे, प्रवक्ता सोनोने सर, उपाध्यक्ष सम्राट सुरवाडे उपाध्यक्ष गजाननभाऊ गवई व तालुका कार्यकर्ते तसेच भारिप बहुजन महासंघांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.