खापरखेड (विलास बेलाडकर)- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दि. 15/9/2019 रोजी पंचायत समिती तेल्हारा जिल्हा परिषद अकोला अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत खापरखेड येथे प्लास्टिक निर्मूलन अभियान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सरपंच सौ. शालुताई रामकृष्ण डाबेराव, उपसरपंच ज्ञानेश्वर महादेव बहाकर, प्रशांत देविदास सावरकर, सौ. योगिणी विलास बेलाडकर, सौ. कुसुम गजानन पोटे, सौ. दर्शना हिम्मत फोकमारे, दिलीप फोकमारे, रामकृष्ण डाबेराव, निलेश खोटरे, अविनाश बहाकर, नथ्थुजी किसन शेळके, सोपान सावरकर, बळीराम फोकमारे, राजेश फोकमारे, राधेश्याम कुटाले, संजय खोटरे, श्रीकृष्ण कुटाले, माधव आमले, संदिप पोटे, सतिष ताथोड, ज्ञानेश्वर पोटे, ज्ञानेश्वर आमले, प्रफ्फुल इंगळे, मयुर कुटाले, ओम ताथोड, वैभव खोटरे, ग्रामरोजगार सेवक कृषी मित्र, आशा अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत शिपाई व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या सर्वांनी मिळून संपूर्ण खापरखेड गावातुन 10 किलो प्लास्टिक गोळा करून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्यात आले.