वाडेगाव (डॉ चांद शेख)- लोकअदालत चा फायदा घेऊन आपसात तील मतभेद दुर करून प्रकरण कायम स्वरूपी मिटवता येतो. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सोवा प्राधिकरण,अकोला तसेच तालुका विधी सेवा समीती, बाळापूर यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनाक १५ सप्टेंबर रविवार रोजी वाडेगांव येथे फिरते लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम ग्राम पंचायत च्या वतीने घेण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एस सी सिरसाट, प्रमुख पाहुणे म्हणून समाज सेवक संतोष दादा मानकर, जेष्ठ विधीज्ञ अॅड मुक्तेस्वर तिरुख, सरपंच सौ अन्नपुर्णा मानकर, ग्राम विकास अधिकारी डि.एस.अंभोरे, तंटामुक्ती अध्यक्ष राजवर्धन डोंगरे, एपीआय महादेव पडघन, अॅड प्रविण अवचार, डॉ एस चांद, ग्रा प सदस्य बुड्डा ठेकेदार, राजकुमार अवचार, रंजीत अहीर, नारायण ठाकरे, सोपान मोरे, संदीप घोडेकर, दत्ता मानकर, आदी मान्यवर उपस्थीत होते.
प्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थीत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लोकअदालत चा फायदा घेऊन आपसात तील मतभेद दुर करून प्रकरण कायम स्वरूपी मिटवता येतो. त्या नंतर फिरते लोक अदालची सुरुवात करण्यात आली असे लोक अदालत चे पॅनल प्रमुख निवृत्त न्यायाधीश एस सी सिरशाट यांनी सांगितले. यावेळी या लोकआदलतमध्ये आलेल्या ११ प्रकरणा पैकी ८ प्रकरणा चा निपटारा करन्यात आला. यामध्ये दंडाची एकून रक्कम १४०० रुपये तसेच १ प्रकरणात बँकेची वसूली दोन लाख रुपये अशी रक्कम जमा झाली आहे. या अदालत मध्ये कार्यक्रमाला अॅड सुबोध डोंगरे, अॅड भगवान दंदी, अॅड वैशाली पाटील, अॅड जामोदे, अॅड धनोकार, राजेंद्र पल्हाडे ,अशोक अवचार, श्रीकृष्ण टाकलकर, सुभाष सरप, बाळू घाटोळ, दिनेश धाडसे , अंकुश शाहणे, बंडू ठोंबरे, निवृत्ती सरप ,पो. कॉ. अशोक नवलकर, तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य , गावकरी ,ग्रां प कर्मचारी इत्यादी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ चांद यांनी केले. प्रास्ताविक ग्राम विकास अधीकारी डी एस अंभोरे यांनी तर आभार अॅड प्रविण अवचार यांनी केले.