बाळापूर (प्रतिनिधी)- दि. १३/०९/२०१९ रोजी पोलीस स्टेशन बाळापुर जि.अकोला अंतर्गत बाळापुर शहरामध्ये मोहरम निमित्त सार्वजनिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या करीता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोहरमची मिरवणुक रात्री २१.४५ वाजता दरम्यान जुना सरकारी दवाखाना या ठिकाणी आली असतांना मिरवणुकीतील नौशाद खान डरमाईल खान रा.बाळापर यांचे मंडळाच्या काही ईसमांचा आपसा मध्ये वाद झाल्याने त्या ठिकाणी कर्तव्यावर हजर असलेले पो. उप. नि. विठ्ठल वाणी यांनी सहकारी कर्मचारी यांचेसह वाद सोडविण्याचा प्रयत्न करीत असतांना (१) अब्दुल सलीम अब्दुल गफफार (२) इलियास खान उर्फ राजा काल्या (३)शोएब खान नासिर खान (४) हुसेन शहा रहिम शहा (५)हसन शहा रहिम शहा (६) नौशाद खान ईरमाईल खान व ईतर १० ते १५ लोकांनी कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांशी वाद घालुन त्यांना लोटपाट केली व पोलीसांवर दगडफेक केली.
त्यामध्ये कर्तव्यावरील पो.उप.नि.श्री. विठ्ठल वाणी, पो.ना. सलीम, पो.कॉ. शकिल, पो. कॉ. प्रशांत, पो. कॉ. मयुर हे कर्मचारी किरकोळ जखमी झाले. पो. उप. नि. विठ्ठल वाणी यांचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन बाळापुर येथे (१) अब्दुल सलीम अब्दुल गफफार (२) इलियास खान उर्फ राजा काल्या (३)शोएब खान नासिर खान (४) हुसेन शहा रहिम शहा (५) हरान शहा रहिम शहा (६) नौशाद खान ईरमाईल खान व ईतर १० ते १५ आरोपी विरूध्द कलम-१४३, ३५३, ३३२, ३३६, ५०४ भादंवी सह कलम-१३५ महाराष्ट्र पोलीस कायदयाअन्वये वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील सहा आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्हयातील ईतर सहभागी आरोपीना लवकर अटक करण्याची कारवाई सुरू आहे.