तेल्हारा (प्रतिनिधी)- वान हनुमान सागर धरणातील पाणी शासनाने अकोला करिता आरक्षित केले तो शासन निर्णय रद्द करण्यात यावा व लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी तेल्हारा येथे भव्य बैलगाडी मोर्चा सकाळी 10 वाजता आठवडी बाजार येथून तहसील कार्यालया पर्यंत काढण्यात येणार आहे.
वाण प्रकल्पाचे पाणी अकोला अमृत योजनेत आरक्षित केले यामुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिचनाचा प्रश्न निर्माण झाला शासनाने अकोला करिता पाणी आरक्षित करण्याबाबत जो निर्णय घेतला तो रद्द व्हावा यासाठी नियोजित शनिवार दि 14 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता आडवडी बाजार तेल्हारा येथून बैलगाडी मोर्चा तहसील कार्यालयावर निघणार आहे या मध्ये हजारो शेतकरी बांधव सहभागी होणार असल्याचे वाण पाणी बचाव कृती समितीने सांगीतले आहे.